Posts

Showing posts from March, 2018

थेंब

           थेंब हंडा आणि बादली घेवुन वणवण फिरतो आहे तुझ्याच चुकिची शिक्षा न सांगता भोगतो आहे अश्रुगत टपकणारा झरा आता खुणावतो आहे वेळ अजुन गेली नाही प्रत्यक्ष सुनावतो आहे चारही दिशांची बोलकी रान तुला पाहवली नाही त्यांचेच आकांततांडव तु आता भोगतो आहे तुझीच कुऱ्हाडीची धार तुझ्यावर उलटली आहे तु घातलेला मुळांवर वार थेंबागत टपकत आहे      -विशाल दा. धिवरे अंबासनकर/९९२१९३४६३७

प्रेम

          प्रेम प्रेम काही नवीन नाही तो एक खजिना असतो मैत्री अथवा नात्यातला सुंदर दागिणा असतो नवप्रेयसीच्या सहवासातील हा गुण देखणा असतो काळानुरुप तो सुद्धा उणा दुना होत असतो प्रेम हा आईच्या मायेचा पान्हा असतो लडीवाळ शब्दांचा गुळाचा घाना असतो मानवी जीवनात रूजलेला दाणा असतो भरपिकात गंधणारा कोंथिंबिरीचा धना असतो नवदाम्पत्याचा खराखुरा नाटकी बहाणा असतो वेळोवेळी सुचणारा खोचक उखाणा असतो       -विशाल दा.धिवरे  अंबासनकर/९९२१९३४६३७

मुके शब्द

        मुके शब्द मुके शब्द मला सुचतात भावनांनी बहरत ओठांवर येतात नाही शृंगार, नाही रस असे निरस शब्द माझे असतात कातरवेळी सुर्याला बघुन अमृत ते पाझरतात आणि मग काय? मुके शब्द मला सुचतात... ना कांगावा, ना अतिशोयक्ती पाझर असतो स्वमनास भावणारा समाजाशी सुसंगत होणारा पथदर्शक आणि काय? मुके शब्द मला सुचतात... ना वणवा ना वाळवंट धगधगती असते आग अन्यायाची दुर्जनांना खाक करायची होळी आणि काय? मुके शब्द मला सुचतात... ना चित्र ना रंग प्रतिबिंब असतात समाजातील शोषितांचे, कष्टकऱ्यांचे बहुजनांचे आणि काय? मुके शब्द मला सुचतात...      -विशाल दा. धिवरे अंबासनकर/   ९९२१९३४६३७ what's up

लेखणी

       लेखणी लेखणी बोलली पाहिजे लेखणी चालली पाहिजे धावतधावत मनामनाला सहजच भिनली पाहिजे।।धृ।। प्रस्थापितांची गाथा विस्थापितांची व्यथा जुनीच चाललेली प्रथा लेखणीत उतरली पाहिजे।।१।। आपला बळी राजा, राजकारणी गाजावाजा, दीन सामान्य प्रजा शब्दातित दिसली पाहिजे।।२।। चारही दिशांना साद सामाजिकतेची आस एकच काव्यनाद होवुन कानात गुणगुणली पाहिजे।।३।। तळागाळातील मार मानवी प्रेरक विचार स्पष्टतेचा व्यवहार काव्यात गुंफला पाहिजे।।४।। शब्दातीत किर्ती ज्ञानवंत मुर्ती जीवनाची स्फुर्ती स्मरणात उरली पाहिजे।।५।।       -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

दुःख

         दुःख अस्वस्थ होते मन प्रश्नांना सामोरे जातांना आतल्या आत घुटमळते बाजु ह्दयातील मांडताना पापण्याही लवलवतात अश्रुंची सावरासावर करताना शब्दच दाटुन थांबतात गहिवरुन मन येतांना दिवसभर मोकळ आभाळ अचानक गच्च भरून यावे काळेभोर होवुन गदगदुन ओघळत खाली  यावे करांनी या बांध घालावेत सांडव्याकरवी अश्रु पुसावेत श्वासाच्या या अश्वगतीला भावनांनी लगाम लागावेत तसंच आतल्या आत गिळंकृत करुन दुःख उसना आणावा लागतो भाव सुखाशी तडजोडीत        -विशाल दा.धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

चेष्टा

      चेष्टा वाईट असो वा न ऐकु अशी वाचाळ वाणी तिही ऐकावी वाटते चावडी अथवा कट्ट्यावर, वेळ मारून नेण्यासाठी वा विरंगुळा म्हणुन... उगाच थोबाड उघडुन खी खी करीत आवळावा लागतो सुर आनंद झाल्यागत, ओठांचा लगाम ताणुन दात चमकावे लागतात हसु आल्यागत.... आतल्या आत सगळं दाबुन फुलवावे लागतात मनोरे सगळ्यात सुखी असल्यागत, आणि हळुच साडी, माडी, गाडी करीत दिवास्वप्नाशी दोन हात केल्यावर थांबतो विषय वर्तमानात आल्यावर... चावडीचा भाग होवुन विना औधषाचा काढाच पसरतो भरभर काही का होईना क्षणभर दुःखच राहते दुरवर... तरूण असो वा पौढ व्यंग दुसरीकडेच शोधतात शब्दांची जुळवणी केल्यावर वेळच थांबवतो हे ऐकल्यावर...        -  विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

नारी तु न अबला आता

नारी तु न अबला आता बंधनात अडकवुन घर आणि चूलच सोबतीला मुल निर्णयापासुन दुर असे सदा.... पारतंत्र्य ते स्वातंत्र्य समर ही पार करीत वीणा अन झाशीसारखी सर्वदुर डंका झाला तिचा... काळागत सगळे बदलुन सावित्रीचा ध्यास घेवुन चतुर नार होवुन वावरते आता सबला होत.... घरापासुन ते चंद्रापर्यंत नावच शोभतात तुझी सिंधु असो सुनिता पुरुषार्था गत स्त्रियार्थ गाजवत.... उंचच उंच भरारी घेत नेतृत्व उभारी घेत प्रतिभा या सुमित्रा गिरवत मिरवत राजकिय कित्ता... आता नाही अबला, समाजव्यवस्थेची बला तुझ्याच मुळे सर्वांगसुंदर जीवनाचा मिळे धडा कर्तृत्वासरशी...       -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

गजल महात्म

            गजल महात्म गजल शायऱ्यांची पद्य गाण आहे गजलकाराच्या ज्ञानाची खाण आहे प्रत्येक मुशायरेत वेगळे ध्यान आहे शब्दातील अर्थाला प्रचंड मान आहे गझल त्याचीच भिडते मनामनाला ज्यास शब्दशुंगारांची खरी जाण आहे भुलवी सगळा त्रागा जीवन प्रवासाचा मनाला सावरणारा तो एक प्राण आहे साहित्य काव्यप्रकारात अरबीतील अधिक घट्ट झालेले गजल वान आहे वेळोवेळी शायरीत भुलवुन बोचणारा समाज मनाला छेदणारा तो बाण आहे           -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

बळीराजा

          " अहिराणी कविता "                         बळीराजा गंजच बळी घिसन, आते राजा बनाडान गोळ्यावर गोळ्या, दिसन सत्तावर येवान पाच वरीस मा , कितला गयात आन सेत हाऊच हिशेब मा, मोठाईकि करानं उद्योग ना नाववर,व्यापारी ना तोरा न्यारा थोडथोड करीसन,कर्ज घिसन चोर वर मोरा मना शेतकरीराजा ना, मुठभर पसारा जप्ती आणिसन बँका, जमा करतस सारा दाबी दडपी सगळा, शेतकरीले लुबाडतसं त्याना मालना भाव सोय पाहीन ठरावतसं कचकडाना कागद, सांगेल दाममा घितीन शेतकरी ना मालले, खालपडीन मांगतीन काय आते गोट करीन, कोणवर भरोसा ठेवानं शेती भी आते ,पोटपुरतीच पेराणं गळापावत दोर येई, हाई सगळं विसराणं मोठा घरनं सपन सोडी, शेतकरी याही करानं आपला बापु,अण्णा,तात्या राहेलसाहेल जिभाऊ काय सांगस तुम्हले, हात जोडीन विशालभाऊ.... आपलंआपलं नीट रावानं बंगलापुरती वीट कमाडाणं संकटसनापुढे धीट वव्हानं भाजीपुरतं मीठ आणाणं पोट पुरतं पीट म...

रंग

    हायकु प्रकारा रंग टाकण्याचा एक प्रयत्न           रंग ...      रंगात रंग उधळु या, सारे या    अंग भिजु या      वेगवेगळे रंग विविध, तुम्ही    फेका सगळे   लाल, पिवळा हिरवा, तपकिरी काळा वा निळा    पुसुन टाका द्वेषाचा वा हिंसक आपला खाका   करू साजरे उत्सव रे सगळे   राहु साथ रे  धर्म जात रे दुरच दुर सारू   देवु हात रे थोडा तुझ्या रे अंगावरती टाकु   तुही फेक रे    असाच रंग उधळत जाऊन    सारू बेरंग -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७