नारी तु न अबला आता
नारी तु न अबला आता
बंधनात अडकवुन
घर आणि चूलच
सोबतीला मुल
निर्णयापासुन दुर
असे सदा....
घर आणि चूलच
सोबतीला मुल
निर्णयापासुन दुर
असे सदा....
पारतंत्र्य ते स्वातंत्र्य
समर ही पार करीत
वीणा अन झाशीसारखी
सर्वदुर डंका
झाला तिचा...
समर ही पार करीत
वीणा अन झाशीसारखी
सर्वदुर डंका
झाला तिचा...
काळागत सगळे बदलुन
सावित्रीचा ध्यास घेवुन
चतुर नार होवुन
वावरते आता
सबला होत....
सावित्रीचा ध्यास घेवुन
चतुर नार होवुन
वावरते आता
सबला होत....
घरापासुन ते चंद्रापर्यंत
नावच शोभतात तुझी
सिंधु असो सुनिता
पुरुषार्था गत
स्त्रियार्थ गाजवत....
नावच शोभतात तुझी
सिंधु असो सुनिता
पुरुषार्था गत
स्त्रियार्थ गाजवत....
उंचच उंच भरारी घेत
नेतृत्व उभारी घेत
प्रतिभा या सुमित्रा
गिरवत मिरवत
राजकिय कित्ता...
नेतृत्व उभारी घेत
प्रतिभा या सुमित्रा
गिरवत मिरवत
राजकिय कित्ता...
आता नाही अबला,
समाजव्यवस्थेची बला
तुझ्याच मुळे सर्वांगसुंदर
जीवनाचा मिळे धडा
कर्तृत्वासरशी...
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
समाजव्यवस्थेची बला
तुझ्याच मुळे सर्वांगसुंदर
जीवनाचा मिळे धडा
कर्तृत्वासरशी...
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment