रंग


    हायकु प्रकारा रंग टाकण्याचा एक प्रयत्न
       
  रंग...
     रंगात रंग
उधळु या, सारे या
   अंग भिजु या

     वेगवेगळे
रंग विविध, तुम्ही
   फेका सगळे

  लाल, पिवळा
हिरवा, तपकिरी
काळा वा निळा

   पुसुन टाका
द्वेषाचा वा हिंसक
आपला खाका

  करू साजरे
उत्सव रे सगळे
  राहु साथ रे

 धर्म जात रे
दुरच दुर सारू
  देवु हात रे

थोडा तुझ्या रे
अंगावरती टाकु
  तुही फेक रे 

  असाच रंग
उधळत जाऊन
   सारू बेरंग
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता