मुके शब्द
मुके शब्द
मुके शब्द मला सुचतात
भावनांनी बहरत ओठांवर येतात
नाही शृंगार,
नाही रस
असे निरस शब्द माझे असतात
कातरवेळी सुर्याला बघुन
अमृत ते पाझरतात
आणि मग काय?
मुके शब्द मला सुचतात...
मुके शब्द मला सुचतात
भावनांनी बहरत ओठांवर येतात
नाही शृंगार,
नाही रस
असे निरस शब्द माझे असतात
कातरवेळी सुर्याला बघुन
अमृत ते पाझरतात
आणि मग काय?
मुके शब्द मला सुचतात...
ना कांगावा,
ना अतिशोयक्ती
पाझर असतो स्वमनास भावणारा
समाजाशी सुसंगत होणारा
पथदर्शक आणि काय?
मुके शब्द मला सुचतात...
ना अतिशोयक्ती
पाझर असतो स्वमनास भावणारा
समाजाशी सुसंगत होणारा
पथदर्शक आणि काय?
मुके शब्द मला सुचतात...
ना वणवा
ना वाळवंट
धगधगती असते आग अन्यायाची
दुर्जनांना खाक करायची
होळी आणि काय?
मुके शब्द मला सुचतात...
ना वाळवंट
धगधगती असते आग अन्यायाची
दुर्जनांना खाक करायची
होळी आणि काय?
मुके शब्द मला सुचतात...
ना चित्र
ना रंग
प्रतिबिंब असतात समाजातील
शोषितांचे, कष्टकऱ्यांचे
बहुजनांचे आणि काय?
मुके शब्द मला सुचतात...
-विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७ what's up
ना रंग
प्रतिबिंब असतात समाजातील
शोषितांचे, कष्टकऱ्यांचे
बहुजनांचे आणि काय?
मुके शब्द मला सुचतात...
-विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७ what's up
Comments
Post a Comment