बळीराजा
" अहिराणी कविता "
बळीराजा
गंजच बळी घिसन, आते राजा बनाडान
गोळ्यावर गोळ्या, दिसन सत्तावर येवान
बळीराजा
गंजच बळी घिसन, आते राजा बनाडान
गोळ्यावर गोळ्या, दिसन सत्तावर येवान
पाच वरीस मा , कितला गयात आन सेत
हाऊच हिशेब मा, मोठाईकि करानं
हाऊच हिशेब मा, मोठाईकि करानं
उद्योग ना नाववर,व्यापारी ना तोरा न्यारा
थोडथोड करीसन,कर्ज घिसन चोर वर मोरा
थोडथोड करीसन,कर्ज घिसन चोर वर मोरा
मना शेतकरीराजा ना, मुठभर पसारा
जप्ती आणिसन बँका, जमा करतस सारा
जप्ती आणिसन बँका, जमा करतस सारा
दाबी दडपी सगळा, शेतकरीले लुबाडतसं
त्याना मालना भाव सोय पाहीन ठरावतसं
त्याना मालना भाव सोय पाहीन ठरावतसं
कचकडाना कागद, सांगेल दाममा घितीन
शेतकरी ना मालले, खालपडीन मांगतीन
शेतकरी ना मालले, खालपडीन मांगतीन
काय आते गोट करीन, कोणवर भरोसा ठेवानं
शेती भी आते ,पोटपुरतीच पेराणं
शेती भी आते ,पोटपुरतीच पेराणं
गळापावत दोर येई, हाई सगळं विसराणं
मोठा घरनं सपन सोडी, शेतकरी याही करानं
मोठा घरनं सपन सोडी, शेतकरी याही करानं
आपला बापु,अण्णा,तात्या राहेलसाहेल जिभाऊ
काय सांगस तुम्हले, हात जोडीन विशालभाऊ....
काय सांगस तुम्हले, हात जोडीन विशालभाऊ....
आपलंआपलं नीट रावानं
बंगलापुरती वीट कमाडाणं
संकटसनापुढे धीट वव्हानं
भाजीपुरतं मीठ आणाणं
पोट पुरतं पीट मळानं
हासी बोली राहीन
हिटफिट कमी करानं
-विशाल दा. धिवरे अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment