लेखणी
लेखणी
लेखणी बोलली पाहिजे
लेखणी चालली पाहिजे
धावतधावत मनामनाला
सहजच भिनली पाहिजे।।धृ।।
लेखणी बोलली पाहिजे
लेखणी चालली पाहिजे
धावतधावत मनामनाला
सहजच भिनली पाहिजे।।धृ।।
प्रस्थापितांची गाथा
विस्थापितांची व्यथा
जुनीच चाललेली प्रथा
लेखणीत उतरली पाहिजे।।१।।
विस्थापितांची व्यथा
जुनीच चाललेली प्रथा
लेखणीत उतरली पाहिजे।।१।।
आपला बळी राजा,
राजकारणी गाजावाजा,
दीन सामान्य प्रजा
शब्दातित दिसली पाहिजे।।२।।
राजकारणी गाजावाजा,
दीन सामान्य प्रजा
शब्दातित दिसली पाहिजे।।२।।
चारही दिशांना साद
सामाजिकतेची आस
एकच काव्यनाद होवुन
कानात गुणगुणली पाहिजे।।३।।
सामाजिकतेची आस
एकच काव्यनाद होवुन
कानात गुणगुणली पाहिजे।।३।।
तळागाळातील मार
मानवी प्रेरक विचार
स्पष्टतेचा व्यवहार
काव्यात गुंफला पाहिजे।।४।।
मानवी प्रेरक विचार
स्पष्टतेचा व्यवहार
काव्यात गुंफला पाहिजे।।४।।
शब्दातीत किर्ती
ज्ञानवंत मुर्ती
जीवनाची स्फुर्ती
स्मरणात उरली पाहिजे।।५।।
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
ज्ञानवंत मुर्ती
जीवनाची स्फुर्ती
स्मरणात उरली पाहिजे।।५।।
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment