चेष्टा
चेष्टा
वाईट असो वा
न ऐकु अशी वाचाळ वाणी
तिही ऐकावी वाटते
चावडी अथवा कट्ट्यावर,
वेळ मारून नेण्यासाठी
वा विरंगुळा म्हणुन...
वाईट असो वा
न ऐकु अशी वाचाळ वाणी
तिही ऐकावी वाटते
चावडी अथवा कट्ट्यावर,
वेळ मारून नेण्यासाठी
वा विरंगुळा म्हणुन...
उगाच थोबाड उघडुन खी खी करीत
आवळावा लागतो सुर
आनंद झाल्यागत,
ओठांचा लगाम ताणुन
दात चमकावे लागतात
हसु आल्यागत....
आवळावा लागतो सुर
आनंद झाल्यागत,
ओठांचा लगाम ताणुन
दात चमकावे लागतात
हसु आल्यागत....
आतल्या आत सगळं दाबुन
फुलवावे लागतात मनोरे
सगळ्यात सुखी असल्यागत,
आणि हळुच साडी, माडी, गाडी करीत
दिवास्वप्नाशी दोन हात केल्यावर
थांबतो विषय वर्तमानात आल्यावर...
फुलवावे लागतात मनोरे
सगळ्यात सुखी असल्यागत,
आणि हळुच साडी, माडी, गाडी करीत
दिवास्वप्नाशी दोन हात केल्यावर
थांबतो विषय वर्तमानात आल्यावर...
चावडीचा भाग होवुन
विना औधषाचा काढाच
पसरतो भरभर
काही का होईना
क्षणभर दुःखच राहते दुरवर...
विना औधषाचा काढाच
पसरतो भरभर
काही का होईना
क्षणभर दुःखच राहते दुरवर...
तरूण असो वा पौढ
व्यंग दुसरीकडेच शोधतात
शब्दांची जुळवणी केल्यावर
वेळच थांबवतो हे ऐकल्यावर...
- विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment