दुःख


         दुःख
अस्वस्थ होते मन
प्रश्नांना सामोरे जातांना
आतल्या आत घुटमळते
बाजु ह्दयातील मांडताना

पापण्याही लवलवतात
अश्रुंची सावरासावर करताना
शब्दच दाटुन थांबतात
गहिवरुन मन येतांना

दिवसभर मोकळ आभाळ
अचानक गच्च भरून यावे
काळेभोर होवुन गदगदुन
ओघळत खाली  यावे

करांनी या बांध घालावेत
सांडव्याकरवी अश्रु पुसावेत
श्वासाच्या या अश्वगतीला
भावनांनी लगाम लागावेत

तसंच आतल्या आत
गिळंकृत करुन दुःख
उसना आणावा लागतो भाव
सुखाशी तडजोडीत
       -विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता