Posts

Showing posts from April, 2018

पुस्तक..

       पुस्तक ... पुस्तक होता संगती, दुर अज्ञानाची भीती, वाढे ज्ञानाची संपत्ती, विचारासवे।। समृद्धी अन प्रेरणाही, अनुभवांची खाणही, हिऱ्यागत उजळूनही, तेजासम।। विद्वानांचे शब्दामृत, सद्सद्तेचा विवेकदूत, सुविचारांचे माय-तात, ग्रंथसंपदा।। अथांग ज्ञानसागर, मुर्तिमंतांची बखर, ऐतिहासिक जागर, इतिहासाचा।। संतांची निर्मल वाणी, सत्य हेच वचनी, निर्मिक अशी लेखणी, ज्ञानवाणी।।      -विशाल दा.धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

कातरवेल...

         कातरवेल .... काही चुकल्यागत कातरवेल संपते फिरून न पाहता आणि चुकलेपण दुर सारण्यासाठी रात्र दिवसाचा प्रवास सुरू होतो न थांबता कातरवेलीपर्यंत... सुख अन् दुःखही अशीच असतात का? चुकल्यागत परत परत वर्णीच लावतात वेगवेगळ्या प्रसंगानुरूप सुरूच असतो प्रवास जीवनाच्या शेवटापर्यंत... लालसर पिवळ्या रंगाची उधळण क्षितिजाला घेराव घालीत दिवस भरातल्या प्रश्नांची यादीच रंगते आकाशात... क्षणार्धात काळोख गडद होत गगनात निशा गिळंकृत करीत भास्करास स्वप्नही भंगतात थांबुन नभातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यागत हुलकावणी देत चांदोबाच्या सान्निध्यात पार होते रात्र मदमस्त होऊन स्वप्नविहारात नवीन स्वप्नांचा आकार घेत दिनकर कवडसे टाकतो शीतल ,निर्मळ, तिरकस, भेदक, दाहक, वाऱ्यासवे गरमागरम,तांबुस कातरवेलीपर्यंत ....         -विशाल धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

जुनी रीत...

    जुनी रीत ... जुनी पुराणी गोट म्हणीन घडेल गोट सांगणी पडीन आपला याळ न्यारा व्हतात आत्येनी पिढीला सांगणा पडीन आजोबास्ना धाक व्हता चुलता काकास्ना च्याप व्हता सकाळपसुन ते संध्याकाळपावत कामस्ना भता व्याप व्हता सांगता इये ना बोलता इये हाच मोठा राग व्हता तरीभी सगळास्मा मयाना जीव दाबेल पोतागत भरेल व्हता आखाजी दिवाळीले नवा कपडा दिसेत लगनयाव सणसुदमा बिनइस्तरीमा उठाई दिसेत मामा, मावशी ,काका, काकू सगळा सगळा विचारेपुसेत पडक्या घरमा मुडक्या पलंग दाबी चेपी सगळा बसेत चेष्टा चेष्टा मा गाळ्या दियेत हासिबोली रडे कुडेत याहीभाहीना पाहुणचार करता घरनं बोडके ईकी इयेत जुनाच जमाना चांगला व्हता माणुस भता भोळा व्हता आभागोभा कसाना नव्हता माणुसकीना पान्हा व्हता        -विशाल दा.धिवरे अंबासनकर/९९२१९३४६३७

दिवस उजाडल्यावर..

       दिवस उजाडल्यावर .... कोंबड्याची भांग, जात्यावरचे गाणं, गाई गुरांचं हंबरणं, बैलगाडीचे कण्हणं, भास्कराचा लपंडाव, कमरेवरचा घडा, मंद पण सुरेल भूपाळी, वरदळ माणसांची, स्वयंपाकाची लगभग, घरातील सारवासारव, पक्ष्यांचा किलबिलाट, रूंजुमुंजु पहाट कुठे गडप झाली, सिमेंटच्या साम्राज्यात दिसेनाशी झाली मानवाच्या धावपळीत लपंडावातला भास्कर कधीच दिसलाच नाही यंत्राळलेल्या जीवनात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कारखान्यात होते त्यातच गुरफुटून भानच नसते दिनक्रमाचे, बहुमूल्य जीवनाचे आठवड्यातील एक वार विरामाचा उणंधुणं करण्यात नाकीनऊ आणतो आणि परत ते आणि तेच असते संसारगीत कुठल्याही संगीताविना रेटणारे आलार्मच्या घंटीवर धावणारे यांत्रिकता आल्यासारखे कधीतरी दिनकर प्रकट झाल्यागत डोळे लुकतात भरपुर दिवसांनी पाहिल्यागत शरमेनं मान खाली होते सुर्यराजाने नयन विस्फारल्यावर मग आठवतात गुजगोष्टी बालपणीच्या दिवस उजाडल्यावर...।।।          -विशाल दा.धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस काहिसा दिलासा थोडासा हवासा अवकाळी थरारा नंतर पेट घेई भू वारा मग त्राही त्राही करून घामाच्या धाराही येतील नकोशा होवुन अंगभर घरात अथवा बाहेर पिकांचे रूसलेपण बळीराजाचा चेहराच वर्णित घामाचे मोल अश्रुत मिळुन मातीमोल होत तरीही मातीत नांगर फिरते त्याच दुःखात नवचेतना देत जीवितासाठी पिकांसाठी, कुंटुंबासाठी आटलेल्या विहिरीगत भावही आटतात लोचनही लुकलुकतात भर ऊन्हा-तान्हात दिर्घ श्वास घेत आकाशाचे नृत्य ऊन सावलीचा खेळ यात बसवावा लागतो मेळ       -विशाल दा.धिवरे अंबासनकर/९९२१९३४६३७

वणवा

  "हायकू प्रकारात कविता "               वणवा   भर उन्हात       रानही पेटलयं             धगधगत   वारा पळत       विस्तव पेरतोय            सळसळत   जंगल स्तब्ध       पडले निपचित          नसता शब्द   नाही रे कुणी      चिटपाखरू संग            जळाले अंग   वेली, झुडपे       उन्हातच झोपली           आगीत गेली   उपाशीपोटी       विसरली तहान,           जीवाचे भान   पालटे रूप        बदलुनीया रंग      ...

प्रतिबिंब....।

                प्रतिबिंब माझा आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला. शाळेत जाण्याच्या घाईने मी घरून निघालो. सगळीकडे शांत वातावरण होते. आणि मी रस्त्याने मोटारसायकलने जात होतो. आणि मी सवयीप्रमाणे कुणी लिफ्टसाठी हात केला तर गाडी थांबवतो. व वडनेरजवळील रस्त्यावर गाडी थांबवली. मध्यमवयीन मनुष्य, कपडे चांगले, बोलका चेहरा, उंचपुरा काहीशी धिप्पाड देहयष्टी असलेला इसम. हात उंचावत म्हणाला, "अहो साहेब" हाताने इशारा केला मालेगावच्या दिशेने. मी बसण्याचा इशारा केला. आणि तो बसला. तसा साधा भोळा वाटला. माझी जन्मकुंडली काढावी तशी विचारपुस त्याने सुरू केली. आपण कुठले? काय करता? नोकरीला कुठे आहात? अशा नानाविविध प्रश्नाचा बडीमार सुरू केला. मला असे वाटले हा इसम सुशिक्षित किंवा चांगल्या कुंटुंबातील असला पाहिजे. मी ही सर्व बाबी प्रामाणिकपणे सांगत होतो. असच बोलता बोलता अजंग मी गाठलं. आणि रस्त्याच्या बाजुला एक कुत्रा दिसला. मला जोरात आवाज देवुन त्या इसमाने "गाडी हळुहळु चालवा, कुत्रास्ना काही भरोसा नही साहेब. कवळ घुसी यितीन, त्यास्ना नेम नही. मी व मना पोऱ्या अशाच मालेगाव ...