जुनी रीत...

    जुनी रीत...
जुनी पुराणी गोट म्हणीन
घडेल गोट सांगणी पडीन
आपला याळ न्यारा व्हतात
आत्येनी पिढीला सांगणा पडीन

आजोबास्ना धाक व्हता
चुलता काकास्ना च्याप व्हता
सकाळपसुन ते संध्याकाळपावत
कामस्ना भता व्याप व्हता

सांगता इये ना बोलता इये
हाच मोठा राग व्हता
तरीभी सगळास्मा मयाना जीव
दाबेल पोतागत भरेल व्हता

आखाजी दिवाळीले
नवा कपडा दिसेत
लगनयाव सणसुदमा
बिनइस्तरीमा उठाई दिसेत

मामा, मावशी ,काका, काकू
सगळा सगळा विचारेपुसेत
पडक्या घरमा मुडक्या पलंग
दाबी चेपी सगळा बसेत

चेष्टा चेष्टा मा गाळ्या दियेत
हासिबोली रडे कुडेत
याहीभाहीना पाहुणचार करता
घरनं बोडके ईकी इयेत

जुनाच जमाना चांगला व्हता
माणुस भता भोळा व्हता
आभागोभा कसाना नव्हता
माणुसकीना पान्हा व्हता
       -विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता