अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस
काहिसा दिलासा
थोडासा हवासा
अवकाळी थरारा
नंतर पेट घेई भू वारा
मग त्राही त्राही करून
घामाच्या धाराही येतील
नकोशा होवुन अंगभर
घरात अथवा बाहेर
पिकांचे रूसलेपण
बळीराजाचा चेहराच वर्णित
घामाचे मोल अश्रुत
मिळुन मातीमोल होत
तरीही मातीत नांगर
फिरते त्याच दुःखात
नवचेतना देत जीवितासाठी
पिकांसाठी, कुंटुंबासाठी
आटलेल्या विहिरीगत
भावही आटतात
लोचनही लुकलुकतात
भर ऊन्हा-तान्हात
दिर्घ श्वास घेत
आकाशाचे नृत्य
ऊन सावलीचा खेळ
यात बसवावा लागतो मेळ
-विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
काहिसा दिलासा
थोडासा हवासा
अवकाळी थरारा
नंतर पेट घेई भू वारा
मग त्राही त्राही करून
घामाच्या धाराही येतील
नकोशा होवुन अंगभर
घरात अथवा बाहेर
पिकांचे रूसलेपण
बळीराजाचा चेहराच वर्णित
घामाचे मोल अश्रुत
मिळुन मातीमोल होत
तरीही मातीत नांगर
फिरते त्याच दुःखात
नवचेतना देत जीवितासाठी
पिकांसाठी, कुंटुंबासाठी
आटलेल्या विहिरीगत
भावही आटतात
लोचनही लुकलुकतात
भर ऊन्हा-तान्हात
दिर्घ श्वास घेत
आकाशाचे नृत्य
ऊन सावलीचा खेळ
यात बसवावा लागतो मेळ
-विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment