कातरवेल...


         कातरवेल....
काही चुकल्यागत कातरवेल संपते
फिरून न पाहता
आणि चुकलेपण दुर सारण्यासाठी रात्र दिवसाचा प्रवास सुरू होतो न थांबता कातरवेलीपर्यंत...
सुख अन् दुःखही अशीच असतात का?
चुकल्यागत परत परत वर्णीच लावतात
वेगवेगळ्या प्रसंगानुरूप
सुरूच असतो प्रवास जीवनाच्या शेवटापर्यंत...
लालसर पिवळ्या रंगाची उधळण क्षितिजाला घेराव घालीत
दिवस भरातल्या प्रश्नांची यादीच रंगते आकाशात...
क्षणार्धात काळोख गडद होत गगनात
निशा गिळंकृत करीत भास्करास
स्वप्नही भंगतात थांबुन
नभातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यागत हुलकावणी देत
चांदोबाच्या सान्निध्यात पार होते रात्र
मदमस्त होऊन स्वप्नविहारात
नवीन स्वप्नांचा आकार घेत दिनकर कवडसे टाकतो शीतल ,निर्मळ, तिरकस, भेदक, दाहक, वाऱ्यासवे गरमागरम,तांबुस कातरवेलीपर्यंत ....
        -विशाल धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता