दिवस उजाडल्यावर..


      दिवस उजाडल्यावर....
कोंबड्याची भांग,
जात्यावरचे गाणं,
गाई गुरांचं हंबरणं,
बैलगाडीचे कण्हणं,
भास्कराचा लपंडाव,
कमरेवरचा घडा,
मंद पण सुरेल भूपाळी,
वरदळ माणसांची,
स्वयंपाकाची लगभग,
घरातील सारवासारव,
पक्ष्यांचा किलबिलाट,
रूंजुमुंजु पहाट
कुठे गडप झाली,
सिमेंटच्या साम्राज्यात दिसेनाशी झाली
मानवाच्या धावपळीत लपंडावातला भास्कर कधीच दिसलाच नाही
यंत्राळलेल्या जीवनात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कारखान्यात होते
त्यातच गुरफुटून भानच नसते दिनक्रमाचे,
बहुमूल्य जीवनाचे
आठवड्यातील एक वार विरामाचा उणंधुणं करण्यात नाकीनऊ आणतो
आणि परत ते आणि तेच असते संसारगीत
कुठल्याही संगीताविना रेटणारे
आलार्मच्या घंटीवर धावणारे
यांत्रिकता आल्यासारखे
कधीतरी दिनकर प्रकट झाल्यागत
डोळे लुकतात
भरपुर दिवसांनी पाहिल्यागत
शरमेनं मान खाली होते
सुर्यराजाने नयन विस्फारल्यावर
मग आठवतात गुजगोष्टी बालपणीच्या
दिवस उजाडल्यावर...।।।
         -विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता