Posts

Showing posts from January, 2018

अहिराणी माय

    अहिराणी माय जवय मनी अहिराणी माय रडस धाय धाय तीना पोरं करत तीले इंग्रजीमा बाय बाय लाडे लाडे बोलणारा शबद कुरतडाई जातस सुरू वव्हाना आगधार मना बोल खुडाई जातस मनी काय लाज वाटसं काय कळत नही तुनी गोटनी सूरवात मना शिवाय व्हत नही अहिराणी बोली बोली शाळा तुनी व्हयनी साहेब काय व्हयना लाज तिनी वाटनी चिमण्यांस्नी चिवचिव पशीन रातकिडानी किरकिर पावत मायच माय अहिराणी व्हती घरपशीन शाळा पावत        विशाल दा. धिवरे  अंबासनकर/ ९९२१९३४६३७

भास्करा....

भास्करा अरे भास्करा... तु प्रियकर वेडा कसा मारुनी कितीही चकरा भूलवित नाही ही अप्सरा खळखळुन हसतो हा सागर या भूमीवर भाळतो कसा पसरूनि मेघपरी कर कवेत घेतो भर दिवसा दिवाने मन नवे नव्हे नवी नवलाई भाससी आड येणाऱ्या मेघांनाही सारून तु पाहसी नजर तुझी ही तिच्यावरती रोखुन धरली अशी किरणासरशी तिला स्पर्शुनी प्रेमाचा दाह ही पेरशी ब्रम्हांडाचा देखणा चेहरा तिला तु भाससी सांजसकाळी लडीवाळपणाने तिला तु उठविसी.           विशाल दा. धिवरे अंबासनकर/                    ९९२१९३४६३७ 

शब्दांकरवी

            शब्दांकरवी शब्दच होतात उणे, नसता शहाणपण । शब्दागणिक महती ,थांबते अक्षरावर।। शब्दालंकारांनी शब्द,नटतात मात्र खरे। भाषाशुन्य ज्ञानाने,मरतात भाव सारे।। बनतो खेळ, ट ला ट  र ला री चा। बनते कविता, शब्दांचा मृत साचा।। काळोख ही नसतो। निशा ही नसते। निद्रा असते, क्षणभंगुर जीवनाची।। भयभीत नजरा, चोरीच्या कलमा। सर्वच चव्हाट्यावर, बोलक्या नजरेने।। मनही सलते, धिक्कारीत स्वतःला। नसतात शब्द, मी च्या सांत्वनाला।। पुसतात शब्द, आसवे मनातले। सरते शेवटी, टोचतात शब्दांकरवी।।         - विशाल दा. धिवरे अंबासनकर /९९२१९३४६३७

मन

               मन सुसाट सुटतं सर्वदुर वाऱ्यासारखं कधी थकल्यागत चिकटतं जुन्या आठवणींशी ओकते दुःख नयनातून फुटुनी पापणीचा बांध ओघळत गालावर नसते त्यास क्षितीज अन दिशा भ्रांतही नसते त्याला निशाची कधीतरी बडबडते ओठावर निडर होत वा धडधडत पण व्यर्थ असते सगळे भावनांचा मेघ गर्जनेपुरता असतो धारेवर धुकं पसरल्यागत धुसर होतं सगळं सुर्याच्या किरणासरशी पोहचतं आभाळी             विशाल धिवरे अंबासनकर /                                  ९९२१९३४६३७

बालपणाची आठवण

         बालपणाची आठवण आजचा मकर संक्रांतीचा दिवस बालपणीची एक आठवण करुन गेला. लहान मुले गल्लीत रडतांना दिसली व आईजवळ पैसे मागत होती. आक्का, "माले पतांग घी दे, गण्याले त्यानी आक्कानी पैसा दिधात, तो चिलु वाण्याना दुकानातुन पतांग घी वना,अं...". आईने काहीनी न बोलता इशाऱ्याने वडीलांच्या कपड्याकडे हात केला आणि हसतच मुलांनी बाबांच्या खिशातुन वीस रूपये घेत आनंदाने उड्या मारत दुकानाकडे धाव घेतली. व रेडिमेट पतंग आणला. पतंगाला दोरी लावत गल्लीत उडवायला लागला. हे सगळे पाहुन जुन्या आठवणींना आवळल्याशिवाय राहवले गेले नाही. पतंग साठी पैसे मागणे तर दुर, पतंगाचे नाव कधीच घरात काढले नाही. पतंगासाठी घरातील प्रयोगवहीचा कागद, दोरा, घरातील नाराळाच्या झाडुच्या काड्या, डिंक म्हणुन थोर नावाच्या वनस्पतीचा चिक अशा बाबी पाहिजे असत. सकाळपासुन ह्या बाबी शोधण्याचा प्रयत्न सुरू व्हायचा. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे घरात नारळाचा झाडू असणे दुर्मिळच असायचे. माझे मित्र जुम्मन, बबन मला सोबतीला असायचे. आम्ही सकाळी उकिरडा शोधत फिरायचो तिथे अर्धी सामुग्री जमा व्हायची. नंतर कागदासाठी थोडी कसरत क...

पर्यटन : कोकण दर्शन व्हाया कोल्हापूर

पर्यटन : कोकण दर्शन  व्हाया कोल्हापूर शब्दांकन : श्री. विशाल दादाजी धिवरे अंबासन ता. सटाणा जि. नाशिक Email: vishaldhiware.123@gmail.com , Mob.: 9921934637 एके दिवशी अचानक प्रवासाचा योग आला. तशी जाण्याबद्दल त्या आधी पुसटशी चर्चा व्हायची , पण वेळेअभावी योग जुळून येत नसे. त्या दिवशी मी असाच घरी बसलो होतो आणि गिरीश दादाचा फोन आला आणि कुठे आहे वगैरे चर्चा झाली व फिरायला जायचे आहे, तू तयारी कर आणि सटाणा पोहोच मी येतो. तो पिंपळनेरहून सटाणा येथे येण्याचे ठरले. मी ही तसाच घाई गडबडीत सॅक भरली , आईला काही कोरडा शिधा तयार करून बांधण्यास सांगितले. आवश्यक एक ड्रेस ,  टॉवेल , ब्र श , पेस्ट आणि गरजेचा मोबाईल चार्जर घेतला. ठिक १२ वाजुन ४५ मिनिटांनी मोटारसायकल ने घरून प्रवासाला सुरवात केली. मोटारसायकलची गरज नव्हती पण परतीच्या वेळेस उशीर झाल्यास तीची गरज भासेल या हेतुने सटाणा पर्यंत नेण्याचे ठरविले. आणि मोटारसायकल माझे मोठेकाका सटाणा येथे राहतात त्यांच्या घराजवळ लावली. पुढील प्रवासास सुरुवात झाली. गिरिशदादा तोपर्यंत सटाणा बसस्थानकाजवळ येवून थांबला होता. मी सॅक पाठीला अडकवली आणि ...