अहिराणी माय

    अहिराणी माय

जवय मनी अहिराणी माय
रडस धाय धाय
तीना पोरं करत तीले
इंग्रजीमा बाय बाय

लाडे लाडे बोलणारा
शबद कुरतडाई जातस
सुरू वव्हाना आगधार
मना बोल खुडाई जातस

मनी काय लाज वाटसं
काय कळत नही
तुनी गोटनी सूरवात
मना शिवाय व्हत नही

अहिराणी बोली बोली
शाळा तुनी व्हयनी
साहेब काय व्हयना
लाज तिनी वाटनी

चिमण्यांस्नी चिवचिव पशीन
रातकिडानी किरकिर पावत
मायच माय अहिराणी व्हती
घरपशीन शाळा पावत


       विशाल दा. धिवरे 
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता