शब्दांकरवी

           शब्दांकरवी
शब्दच होतात उणे, नसता शहाणपण ।
शब्दागणिक महती ,थांबते अक्षरावर।।

शब्दालंकारांनी शब्द,नटतात मात्र खरे।
भाषाशुन्य ज्ञानाने,मरतात भाव सारे।।

बनतो खेळ, ट ला ट  र ला री चा।
बनते कविता, शब्दांचा मृत साचा।।

काळोख ही नसतो। निशा ही नसते।
निद्रा असते, क्षणभंगुर जीवनाची।।

भयभीत नजरा, चोरीच्या कलमा।
सर्वच चव्हाट्यावर, बोलक्या नजरेने।।

मनही सलते, धिक्कारीत स्वतःला।
नसतात शब्द, मी च्या सांत्वनाला।।

पुसतात शब्द, आसवे मनातले।
सरते शेवटी, टोचतात शब्दांकरवी।।
        - विशाल दा. धिवरे
अंबासनकर /९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता