मन

              मन
सुसाट सुटतं सर्वदुर वाऱ्यासारखं
कधी थकल्यागत चिकटतं जुन्या आठवणींशी
ओकते दुःख नयनातून
फुटुनी पापणीचा बांध
ओघळत गालावर
नसते त्यास क्षितीज अन दिशा
भ्रांतही नसते त्याला निशाची
कधीतरी बडबडते ओठावर
निडर होत वा धडधडत
पण व्यर्थ असते सगळे
भावनांचा मेघ
गर्जनेपुरता असतो धारेवर
धुकं पसरल्यागत धुसर होतं सगळं
सुर्याच्या किरणासरशी पोहचतं आभाळी
            विशाल धिवरे अंबासनकर /                                  ९९२१९३४६३७










Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता