पर्यटन : कोकण दर्शन व्हाया कोल्हापूर

पर्यटन : कोकण दर्शन व्हाया कोल्हापूर
शब्दांकन : श्री. विशाल दादाजी धिवरे अंबासन ता. सटाणा जि. नाशिक
Email:vishaldhiware.123@gmail.com, Mob.: 9921934637
एके दिवशी अचानक प्रवासाचा योग आला. तशी जाण्याबद्दल त्या आधी पुसटशी चर्चा व्हायची,पण वेळेअभावी योग जुळून येत नसे. त्या दिवशी मी असाच घरी बसलो होतो आणि गिरीश दादाचा फोन आला आणि कुठे आहे वगैरे चर्चा झाली व फिरायला जायचे आहे, तू तयारी कर आणि सटाणा पोहोच मी येतो. तो पिंपळनेरहून सटाणा येथे येण्याचे ठरले. मी ही तसाच घाई गडबडीत सॅक भरली,आईला काही कोरडा शिधा तयार करून बांधण्यास सांगितले. आवश्यक एक ड्रेसटॉवेल, ब्र,पेस्ट आणि गरजेचा मोबाईल चार्जर घेतला. ठिक १२ वाजुन ४५ मिनिटांनी मोटारसायकल ने घरून प्रवासाला सुरवात केली. मोटारसायकलची गरज नव्हती पण परतीच्या वेळेस उशीर झाल्यास तीची गरज भासेल या हेतुने सटाणा पर्यंत नेण्याचे ठरविले. आणि मोटारसायकल माझे मोठेकाका सटाणा येथे राहतात त्यांच्या घराजवळ लावली. पुढील प्रवासास सुरुवात झाली. गिरिशदादा तोपर्यंत सटाणा बसस्थानकाजवळ येवून थांबला होता. मी सॅक पाठीला अडकवली आणि बसस्थानकापाशी आलो,दादा ही अचानक केलेल्या नियोजनामुळे उपाशीच आला होता मग आम्ही जवळच एका हॉटेलात भजीवडापावभेळ खरमरीत नाश्ता केला आणि निघालो. विना थांबा नाशिक बस जणु आमची वाटच पाहत होती की काय,कंडक्टरने आवाज दिला," चला लवकर ".आम्ही बसमध्ये बसलो. मला तसा बसचा त्रास होतो म्हणुन मी मधील सीटवर बसणे पसंद करतोपण सीट रिकामे नसल्यामुळे मी थोडा वेळ उभाच राहिलो. दादा ड्रारव्हरशी कँबीन सीटवर बसून गप्पा मारत होता. मग दादा ड्रारव्हरने पहिल्या सीटवरील सामान बाजुला ठेवायला सांगुन मला जागा करुन दिली. आणि मी आराम खुर्चीत बसावे तसे पाय लांबवुन बसलो. आणि थोड्या गप्पा घरच्यांविषयी गिरीश दादाशी  झाल्यात . पण नाशिक हुन पुढचा मार्ग कसा असेल ही चर्चा सुरू झाली . मग आमच्या लहान भावाला याबाबत कल्पना देवु असे ठरले . तो पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी राहत असे. मी लगेच फोन केला त्याला सांगितलेआम्ही पुण्यात येणार आहोत. त्याला चेष्टा मस्करी केल्यागत वाटले,नंतर स्वतः फोन करून शहानिशा केली. असा हा प्रवास नाशिक जुन्या बसस्थानक येथे थांबला होता  . तेथुन पुढे नवीन बसस्थानक ठक्कर बाप्पा नाशिक पर्यंत पायी पायीच गेलो. चहा वगैरे घेत गाडीची चौकशी केली . आणि शिवशाही या आरामदायी बसची तिकीटे घेतली व बसमध्ये जाऊन बसलो. बस वातानुकुलित पण आरामदायी होती १३,१४नंबरच्या सीटवर आम्ही बसलो. शिवशाहीतला माझा पहिलाच प्रवास तिथे चार्जिंग ची सुद्धा व्यवस्था होती .
काही अंतर पुढे गेल्यावर बस हॉटेल रायगड येथे थांबली . आम्ही कॉफी घेतलीआणि नवीन गोष्ट अशी कीकॉफी पिण्यासाठी स्ट्रा सुद्धा होता. स्ट्रा च्या सहाय्याने कॉफी पिण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही जीभ पोळून घ्यावी लागली. नंतर फुर्र फुर्र करत आनंद घ्यावा लागला. त्याचा छान एक सेल्फी काढला व फेसबुकवर पाठवला. बस जास्त वेळ थांबणार नव्हती मग जेवणाचे काय मग जेवण पुण्यात घ्यायचे ठरले. तसा फोन करून मिलिंदला कळविले. रात्री बस ठिक १० वाजुन ५०मिनिटांनी शिवाजीनगर जवळ थांबली. मिलिंद वाट पाहतच उभा होता. आम्ही बसमधुन खाली उतरलो,अन त्याने आम्हां दोघांची गळाभेट घेवून आनंद व्यक्त केला. पोटात कावळे काव काव करित होते ,जास्त वेळ न घेता बाजुच्या सागर हॉटेलात जेवणासाठी बसलो . मिलिंद सोबत त्याचा मित्रही आला होता. जेवणाला काय घ्यावे याबत मिश्किल विनोदी चर्चा झाली. अंडा करी माझ्यासाठी मटण खीमा,मटण रसा तिघांसाठी मागवला. आणि माझ्या आईने पाठविलेली तिखट व चपातीही सोबतीला होती जेवण फार मस्त झाले. वरून लिंबुपाणी,स्प्राइट घेतले. जास्त वेळ न देता तिथून निघालो. शिवाजीनगर येथून बस नसल्यामुळे स्वारगेटला रिक्षाने जावे लागले. बसस्थानकाच्या बाहेरच एक ट्रव्हल्स वाला आला,ट्रव्हल्स लगेच निघणारी असेल तर निघु असे ठरले. बाहेरच, “लगेच निघत असेल आम्ही बसतो” असे सांगितले . मध्ये जाऊन बसलो,  सीट बसवत तिथे १ वाजला. ट्रव्हल्स १वा.कोल्हापुरच्या दिशेने रवाना झाली. पुणे ते कोल्हापुर पाच तासांचा प्रवास होता. कोल्हापुर कधी आले ते कळलेच नाहीजेव्हा ड्रायव्हर कोल्हापुर,कोल्हापुर म्हणत होता आम्हांला असे वाटले कीअजुन शेवटचा स्टॉप कोल्हापुर असेल. पण जेव्हा सगळे प्रवाशी उतरले म्हणुन विचारले, "कोल्हापुर,आले का?"तेव्हा हशाच पिकला. "अहोकोल्हापुर आले की,"ड्रायव्हर कोल्हापुरी अदबिने म्हणाला. आम्ही कोल्हापुरला पोहचलो. सकाळचे सहा वाजले होते. तेथील बँनर आमचे स्वागत करीत होते.WELCOME TO KOLHAPUR ‘’.
कोल्हापुर शहर एक ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे. शाहु महाराजांचा जुना राजवाडा,रंकाळा तलावअंबाबाई माता मंदिरभवानी दरवाजा तसेच अलिकडच्या काळातील कणेरी मठशाहु महाराज म्युझियम ही प्रेक्षणिय ठिकाणे आहेत. जवळच काही अंतरावर राधानगरी अभयारण्यज्योतिबा,पन्हाळागड ही सुद्धा आहेत .
आम्ही सकाळी रंकाळा तलावावर सुर्योदयाचा आनंद घेत अंबाबाई माता मंदिर दर्शनाचा लाभ घेतला. दगडांची विशिष्ठ रचनात्मक ठेवण,पौराणिक पद्धतीची रचना,अंबाबाई मातेचे विविध रूपे व त्यांची मंदिरातील बैठक ,मंदिरातील स्तंभ फारच विलोभनिय कलाकृती आहे. त्यानंतर भवानी दरवाजाजुना राजवाडा पाहिल्यावर जुन्या कलाकरांच्या कलेची कल्पना फारच निराळी होती. म्हणजे जिवंत कलाकृती भासविणारा शाहु महाराजांचा भव्य लाकडी पुतळावाघ,रेडा याची प्रतिकृती काही औरच. सभामंडपातील स्तंभ आजच्या काळातील तांत्रिक युगापेक्षा काही पटीने सुंदर आणि मजबुत आहेत. वाड्यातील चावडी कट्टाऐसपैस बसण्यासाठी जागा ऐतिहासिक कलाशैलीचे उदाहरण आहे. राजवाड्याच्या परिसरात खेळाडुंना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणास्तंभाची उभारणी केलेली आहे. महाराजांची बोलकी देहयष्टी त्यांच्या कामाची स्तंभरूपी पावती आजही राजवाड्यात दिमाखात उभी आहे. भव्य दिव्य असा राजवाडा आजही पर्यटकांना भुरळ घालतो. ऐतिहासिक कामाची देखणी लेणी आहे असे म्हणता येईल . कोल्हापुर मनपाच्या बसनेत्यानंतर कणेरी मठाला भेट दिली. आजच्या आधुनिक काळात सामाजिक,सांस्कृतिक , धार्मिक बाबींचा वारसा जपवणुक करणारे सिध्दगिरी म्युझियम अलौकिक ठेवा आहे. विविध पौराणिक चित्रांची कोरीव कलाकृतीचा नमुना,काल्पनिक कलाकृतींचा भरीव नमुनाभव्य दिव्य हत्तींची प्रतिकृती भगवान महादेव व नंदीची मृती अलौकिक आहे. विविध ऋषीमुनींच्या कामाची कमी शब्दात ओळख देणारी प्रतिकृती  व फलक ही आपल्या इतिहासातील घटना डोळ्यासमोर उभ्या करतात. तसेच आर्युवेद,आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीचा विकास व अध्यात्माचा जीवनात उपयोग यांचा अनोखा मेळ घालण्याचा दिव्य प्रयत्न केलेला आहे. सहलीसाठी फारच उत्तम असे ठिकाण आहे.लहानांसाठी आरसा माया महल फारच हास्यदायी व गंमतीदार आहे. जेवणाची महागडी पण उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यानंतर नाश्ता करून पुढील प्रवासास सुरवात झाली. तेथुन रिक्षाने कोल्हापुरात परत गेलो. १वाजला होता. इतर ठिकणी जाणे शक्य नव्हते,जेवण घेता येणे शक्य नव्हते म्हणुन बरोबर खाण्यासाठी कांदा भजी, आळूच्या पानांची भजी असे खाद्य पदार्थ घेतले. कोल्हापुरचा तांबडा रसा खाण्याची मजा घेता आली नाही.  कोल्हापुर ते रत्नागिरी चार तासांचा प्रवास होता. पुढे गणपतीपुळे पाऊन तास. गणपतीपुळेला भेट देण्यासाठी बसने निघालो. बसमध्येच आणलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. आंबा घाटातून बस जाताना अंगावर काटेच उभे राहत होते. रत्नागिरी पर्यंतचा प्रवास करताना खऱ्या कोकणाचे दर्शन व्हायला लागले जे मी पुस्तकात वाचले होते. सगळीकडे झाडेचझाडेडोंगरघाट,लालमातीपुसटसी विरळ वस्तीडोंगरावरची शेती,त्याला जोडून विशाल सागर, मासेमारी,सगळीकडे हिरवळ,मालवणी भाषेचा गोडवा,सागर किनारऱ्यावरील पर्यटन व्यवसाय, उतरत्या छप्पराची पण कौलारू घरे,जहाजबांधणी, लहान बंदरे,लाटांनी खुणावणारा सागर वगैरे अनेक गोष्टी आहेत. असा हा निसर्गाचा अद्भुत ठेवा कोकणात आहे . प्राचीन कोकणाच्या दर्शनाची सुरूवात गणपतीपुळेपासुनच होते. गणपतीपुळे येथील वरदविनायकाचे दर्श़न घेण्याआदी मुषकाचे दर्शन होते. भाविक त्याच्या कानात इच्छा व्यक्त करतात ती गणेशापर्यंत तो पोहचवत असावा असे मला वाटले. मग सभामंडपाला सुरूवात होते. अंतिम वरदविनायक भेट दर्शन होते. पश्चिमेस समुद्र लाटांनी खुणावत असतो. भाविकपर्यटक त्या हाकेला ओ देत समुद्रात डुबकी घेण्याचा मोह आवरू शकत नाहीत. लाटांशी खेळत खारट पाण्यात अंग भिजवून घेतात. घोडागाडी,पाण्यातील स्क्रुटरविविध वस्तुविक्रेतेफोटोग्राफर याच्यात किनारा बहरून उठतो. असे हे बीच तयार होते. समुद्राची ओढ मलाही होतीच मी पाण्यात फेरफटका किनाऱ्याजवळून मारला,काही क्षणचित्रे मोबाईल मध्ये घेतली . सगळ्या गोष्टी विसरून त्या वातावरणात वावरताना काही वेगळाच उत्साह होता. मन प्रसन्न झाले होते. कोकणातील वर्णन कवितेत ऐकलेले होतेपण आता मी स्वतः साक्षीदार झालो होतो.निळी निळाई आकाशाची समुद्राचा सुखद स्पर्श ,नवतरूणींचे लाजणंनवीन जोडप्यांचा चेहऱ्यावरील बोलका खेळवट हर्ष,प्रौढा़ची लगभगलहानांचा पोरकटपणा ,सागर किनाऱ्याची लाटा सरगम नवजीवनाचे संधान बांधत असावित असे भासत होते. सगळीकडे पाण्याचा लाटा जणु प्रेमाने लोटांगण घालीतमावळत्या भास्कराला निरोप देत होत्या.  अशा या मोहक सौंदर्याची अदा सोडवत नव्हती पण काय करणार ,सगळ्या चांगल्या बाबी क्षणिक असतात. आणि परतीच्या मार्गाकडे निघालो जाता जाता किनाऱ्यावर चहा घेतला व कोकणातील बोरं खाल्ली . नजर चोरत किनाऱ्याला दुर सावरत गणपतीपुळेचा परिसर सोडला आणि बसस्थानकापाशी थबकलो,बसची वाट पाहत बसलो. ७ वाजुन ३०मिनिटांनी गणपतीपुळे ते स्वारगेट बस आली व मी परतीच्या प्रवासाला रवाना झालो.

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता