किमया फेसाळलेल्या नभाची गंधाळलेल्या मातीची तांबड पिवळ सूर्याची कशी किमया निसर्गाची? हिरवट खोडांवरती लाल बोंडे काट्याची काळ्या या मातीवरती रंगबिरंगी होती कशी? गवताची सारखी पाती घट्ट असतात मूळ नाती पाण्यातल्या दगडांवरती येते कोठून शेवाळमाती? -विशाल धिवरे
Posts
होळी...
- Get link
- X
- Other Apps
होळी वाईट विचारांची जमवू मोळी समाजमनी शिजवू पोळी नव कार्याचे हस्तक भाळी साजरी करूया वेगळी होळी गावा गावातील झाडे कशाला? निसर्गाचा नायनाट कशाला? शेण गोवऱ्या व भरपूर काही... अन्न धान्याचा नैवैद्य कशाला? एक दिवा सद् विचारांचा वृक्ष लागवड अन् जोपासण्याचा कुविचारांचा वाढला गुंता पेटवून करू चिंतेची चिता चांगल्या रिती वा परंपरा लख्ख प्रकाश ज्ञानाचा जोपासु या नवविवेकाने खरा साक्षात्कार प्रबोधनाचा विज्ञानाची कास धरून जाळून टाकू भेकड प्रथा कसल्या नुसत्या थोतांड गाथा संपवू ठेवून आत्ताच माथा - विशाल दा.धिवरे / अंबासनकर
मुंबानगरी...
- Get link
- X
- Other Apps
मुंबानगरी.. वर्दळ गाड्या, माणसां ची भरभर धावे स्वारी गरगर विमानांची दिनरातीला मुंबाघरी... उंचच उंच इमारतींची शर्यत ही लय भारी नभाशी हातमिळवणी उठुनी दिसे न्यारी... तंत्रज्ञानाच्या किमयेवर मेट्रो आली दारी घड्याळ्याच्या ठोक्यावर धावते मुंबा नगरी... समुद्राच्या सौंदर्यावर भुलते दुनिया सारी पर्यटणाच्या हेतुने रोजच असते वारी... सुर्य चंद्राच्या खेळाशी जुळवुनी घेते खरी नसे तमा कुणाची कामाशी करुनी यारी... Bandstand वरची नवप्रेमींची प्रीत भारी वेगवेगळ्या कलात रमते महाराष्ट्राची चित्रनगरी... ऐतिहासिक ठेवा जपुनी व्यवसायी नाळ खरी नित्याने धावतच राहते मुंबा ही अर्थनगरी... - विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७
पाऊस पहाळी
- Get link
- X
- Other Apps
पाऊस पहाळी मोत्याच्या या प डती धारा फुलवित भुलवित ऊनवारा श्रावणात या धावुनि येति झरझर टपटप जलधारा अंगभर सरसर शहाऱ्यांची आभाळाचा थरार न्यारा सर्वदूर पसरवुन काया सुरू होतो पाऊस पसारा अंगणी या शिंपडुन पहाळी पानांवरती भासती गारा अरुणाच्या कवडसाने भूवरी अवरती दिव्यतारा -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७
- Get link
- X
- Other Apps
तरुणाई.. रास रोस नवखे चेहरे हतबल होतात भविष्याला विसरून जीवनाची नांदी कोसत बसता नशिबाला अर्धवट स्वप्नांकरवी फडकविता पंख कशाला? दुर्बल करित मनाला सदा कोसता आई बापाला कतृत्वाची वेळ भिरकावु न चिकटून बसता कट्टयाला एकदाच हो पुरून टाका वाममार्गाच्या मी पणाला लक्ष्य ठरवुन कार्य करा रे उगाच गमवता क्षण कशाला सखे सोबती नाती गोती सदा हसती क्षणाक्षणाला आपली आपण निती ठरवा जगुनि नवख्या तरुणाईला न पडता डगमगता उठा रे बनवित आदर्श जीवनाला -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७
मेळा विठुरायाचा...
- Get link
- X
- Other Apps
मेळा विठुरायाचा... गजर विठुरायाचा दुमदुमे पंढरीत आषाढी एकादशीला हरिनाम भजनात लाडका कानडा वठे कर्नाटकी रूबाबात अवघा मेळा तयाचा एक होई आषाढात गात थोरवी तयाची वारकरी उल्हासात भेटुनि तया पंढरी रोमांच उठे अंगात आस भेटी दर्शनाची पुर्णत्व पदस्पर्शात सावळा विठु तयांचा उठुनी दिसे मेळ्यात -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७
वेध पाऊसधारेचा
- Get link
- X
- Other Apps
वेध पाऊसधारेचा ढगांचा ढीगच ढीग दररोज सतावतोय भल्या पहाटे गर्दी करत थुई थुई थबकतोय काळाकुट्ट होवुन गडा गडा किंचाळतोय नभाशी संगनमतीने शेतकऱ्यांना खुणावतोय गर गर टपटप करून गप्प घुमानं पडतोय सुर्यराजाच्या आगमनाने दुरवर पळत सुटतोय कापसासारखा पिंजुन मेंढ्याच मेंढ्या भासवतोय रवी गुराखी नभाचा आभाळच जणु हाकतोय वेध पाऊसधारेचा मेघ रंगात उजळतोय येईल मान्सुन वारा सुर्र सुर्र करत ओरडतोय -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७