वेध पाऊसधारेचा
वेध पाऊसधारेचा
ढगांचा ढीगच ढीग
दररोज सतावतोय
भल्या पहाटे गर्दी करत
थुई थुई थबकतोय
काळाकुट्ट होवुन
गडा गडा किंचाळतोय
नभाशी संगनमतीने
शेतकऱ्यांना खुणावतोय
गर गर टपटप करून
गप्प घुमानं पडतोय
सुर्यराजाच्या आगमनाने
दुरवर पळत सुटतोय
कापसासारखा पिंजुन
मेंढ्याच मेंढ्या भासवतोय
रवी गुराखी नभाचा
आभाळच जणु हाकतोय
वेध पाऊसधारेचा
मेघ रंगात उजळतोय
येईल मान्सुन वारा
सुर्र सुर्र करत ओरडतोय
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment