किमया

फेसाळलेल्या नभाची 

गंधाळलेल्या मातीची 

तांबड पिवळ सूर्याची

कशी किमया निसर्गाची?


हिरवट खोडांवरती 

लाल बोंडे काट्याची

काळ्या या मातीवरती

रंगबिरंगी होती कशी?


गवताची सारखी पाती 

घट्ट असतात मूळ नाती

पाण्यातल्या दगडांवरती

येते कोठून शेवाळमाती?

     -विशाल धिवरे 


Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता