मुंबानगरी...


        मुंबानगरी..
वर्दळ गाड्या, माणसांची
भरभर धावे स्वारी
गरगर विमानांची
दिनरातीला मुंबाघरी...
उंचच उंच इमारतींची
शर्यत ही लय भारी
नभाशी हातमिळवणी
उठुनी दिसे न्यारी...
तंत्रज्ञानाच्या किमयेवर
मेट्रो आली दारी
घड्याळ्याच्या ठोक्यावर
धावते मुंबा नगरी...
समुद्राच्या सौंदर्यावर
भुलते दुनिया सारी
पर्यटणाच्या हेतुने
रोजच असते वारी...
सुर्य चंद्राच्या खेळाशी
जुळवुनी घेते खरी
नसे तमा कुणाची
कामाशी करुनी यारी...
Bandstand वरची
नवप्रेमींची प्रीत भारी
वेगवेगळ्या कलात रमते
महाराष्ट्राची चित्रनगरी...
ऐतिहासिक ठेवा जपुनी
व्यवसायी नाळ खरी
नित्याने धावतच राहते
मुंबा ही अर्थनगरी...
       - विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता