...वाटलो गेलो
अंतर मनी काळजात माझ्या या
सुख आणि दुःखात वाटलो गेलो
पसरले रंग निसर्गी तऱ्हेतऱ्हेचे
आकाशी इंद्रधनुत थाटलो गेलो
अंथरूनि कवडसे भूवरी जरी
ग्रहगतीने दिन राती वाटलो गेलो
बहरूनि विविध फुले बागेत तरी
गुलाबी सुगंधात मोहलो गेलो
माणुस म्हणुन जन्मी विश्वात या
धर्म जाती रंगात रंगलो गेलो
विशाल दा. धिवरे
अंंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment