भुंगा आणि कळी


भुंगा आणि कळी

तुझी वाट पाहुन
थकले मी आता
तुझे पिंगा घालणे
विसरले मी आता

मकरंदातील गोडवा
मला आपलेसा नाही
तुझ्या मिलनाची
सकाळ शोधुनी मी पाही

बहुत बहरले बागबगिचे
शोभा तुझवीण नाही
अत्तराचा गंध पसरूनि
छंद प्रेमाचा नाही

तुझं भुंगारून गोंजारणं
काळजात वसे ठायी
उघडताच पाकळ्या माझ्या
ओढ तुझीच राही

तुझ्या अदाकारीने फिदा
होते हर एक कळी
तु जाताच, कोमेजुन
बनते सांजेची बळी

सुकलेल्या पाकळ्या
निपचीत पडतात
भल्या पहाटे आठवण
तुझीच ते करतात

  -विशाल धिवरे अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता