जीवन
जीवन
थकल्यागत होत, हृदय थांबत
कंटाळते जणु
धडधड करून
त्यालाही हवी असते, मोकळीक
व्यसनाधीन असो
वा पहीलवान
त्यालाही ऐकावे लागते, मेंदु राजाचे
सात्विक आहार
निरोगी शरीर
तेलपाणी केल्यागत, भराभर करते
विविध आजार
असंख्य विकार
अडथळेे होवुन करतात, सदा धिक्कार
एक, दोन, तीन
वेदनाक्षम कळ
संपतो सारा जीवनाचा, क्षणार्धात खेळ
कधी दिलासा
शीरा, धमन्यांचा
मार्गातील थांबा होतो दुर, चिकित्सा करून
तरीही थकवा
औषधी गराडा
पोखरून टाकतो मन, असता धनसंपदा
हसणं खेळणं
बिनधास्त जगणं
हेच असते जीवन, तन मन जपत राहणं
थकल्यागत होत, हृदय थांबत
कंटाळते जणु
धडधड करून
त्यालाही हवी असते, मोकळीक
व्यसनाधीन असो
वा पहीलवान
त्यालाही ऐकावे लागते, मेंदु राजाचे
सात्विक आहार
निरोगी शरीर
तेलपाणी केल्यागत, भराभर करते
विविध आजार
असंख्य विकार
अडथळेे होवुन करतात, सदा धिक्कार
एक, दोन, तीन
वेदनाक्षम कळ
संपतो सारा जीवनाचा, क्षणार्धात खेळ
कधी दिलासा
शीरा, धमन्यांचा
मार्गातील थांबा होतो दुर, चिकित्सा करून
तरीही थकवा
औषधी गराडा
पोखरून टाकतो मन, असता धनसंपदा
हसणं खेळणं
बिनधास्त जगणं
हेच असते जीवन, तन मन जपत राहणं
-विशाल धिवरे अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment