ग्रहण


          ग्रहण
ग्रहण लागलीत खरी निरनिराळी
समाजाला भेडसावणारी
दुराग्रह, अत्याचार, भेदाभेद
नितिमत्तेचा नाही थारा
भरदिवसा रस्त्यावर विवस्त्र होते शरीर
होतात जखमा, निखळतो शरीराचा भाग
भरभर गाड्या निघतात
लागलेल्या ग्रहणागत
तिरकस नजरा करून
आपलेपण विसरल्यागत
विव्हळणारा आवाजही दुर्लक्षित होतो
मदतीची वेळ आल्यावर....।
थकल्यावर हृदय आपसुकच रजा घेते
प्राणी पक्षी जमा होतात,
तोडतात लचके
तेव्हा सुचलेलं शहाणपण जागे होते
जमाव येवुन वेगवेगळ्या माणुसपणाच्या
गोष्टी करतात जीव गेल्यावर...।
-: विशाल दा.धिवरे
अंबासनकर /९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता