आंबेमोहर
आंबेमोहर
वसंत ही बहरून फुलला, मोहक
आंबेमोहरांनी...
स्वागतास या धावुनी आली, पक्ष्यांची
कोकीळ राणी ...
गीत हे कुहु कुहुचे, भल्या पहाटे
गुंजवी कानी...
ढुंकुन ऐकत राही, गीत दिनकर
ही सांजपणी
निसर्गातल्या रंगारंगात, सोनेरी
नव किरणांनी
आंब्यास ही डोहाळे लागती मधुर
अशा स्वरांनी
मधमाश्याही पिंगा घालती, रसही ग्राही स्व पचनी
काळ्याभोर खोडावरती, घरही थाटती
ही मधराणी
वाराही गुंजी घालतो, खिळवुन
सहज स्पर्शांनी
निसर्गाची शोभा वाढविते फुलून
उठते फुलदाणी
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment