चिऊताई


    " चिऊताई "
चिव चिव करत
दिवस उजाडला जाई
भुर्र भुर्र करत
दिवस माळवित असे बाई.
इकडून तिकडे
तिकडून इकडे
रोजच असे घाई
अशी होती चिऊताई...
आता कुठे गेली
नजरेत पडत नाही
छोटीशी चिमणाई
भिरभिरत नाही...
टिप टिप टिपत असे
दाणे जणू निवडत असे
मोरीजवळ च्या पाईपाखाली
अंघोळ ती करीत असे...
विजेच्या तारांवरती
शाळा तिची भरायची
चिव चिव करीत शाळेची
सांगता मस्त व्हायची...
कोण जाणे कुठे गेली
आता कुठे दिसत नाही
आईच्या अंगाईत
भुर्र कशी होत नाही...
गाणे चिऊताईचे
कोणी कसे गुणगुणत नाही
निसर्गाशी साद
कुणी ही घालत नाही....
दिसताच क्षणी चिऊ
भरवावा वाटतो खाऊ
घेऊन तिला बरोबर
एकत्र वाटते राहू....
      -विशाल दा धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता