भ्रष्टाचार
भ्रष्टाचार...
भ्रष्टाचार म्हणु का सोयीचा आचार
अडलेल्यांचा घेतलेला समाचार
प्रत्येक कार्यालयात रेंगाळतो
असा एकच विचार
कुणी रडुन वेळ काढतो
कुणी दोन शिव्या सहज आसडतो
शब्दातील घसरण होवुन
कार्यालये आखाडे होतात विना पंचाचे
समाज पाहुन न पाहिल्यासारखा खितपत राहतो उघड्या डोळ्यांनी
आसरा शोधत लोकशाहीचा
नाईलाज म्हणा वा पडलेली नड
सोडवावी लागते उसणवारीत वा खुर्चीवरील लाळ पुसावी लागते कायद्याच्या धाकाने
पण नाकी नऊ आल्याने त्रास आणि माणुस एक गणितच होते
शेवटी असाच एखादा अडलेला बनतो दलाल या दांभटशाहीचा
बोलु लागतो बोली उद्धामपणे
विसरूनी माणुसपण
शेफारून धंदाच होतो त्याचा
शोधत राहतो सावज भेदरलेले
घेतचं राहतो बळी दिवसेंदिवस कोल्ह्यागत कुईकुई करून
हिच कोल्हेकुई आपलेशी होवुन भागच होते नोकरशाहीचा ....
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments
Post a Comment