राजे तुमच्या पराक्रमाचे


   राजे तुमच्या पराक्रमाचे.....
राजे तुमच्या पराक्रमाचे, पोवाडे नुसते ऐकावेत
क्षणभर का होईना, शहारे शौर्याचे अंगभर उठावेत

नाही तलवार आता, तरी लेखनीला धार यावी
अन्यायाला वाचा, मावळा म्हणुन मी फेडावी

रणांगणे नटली आता, माणसातील अफजलपणाने
वाघनखे ही शब्दांची, कोथळा काढावा लेखणीने  

गुगली किंवा फटकांनी, चिमटा काढावा विचाराने
वाईट विचार किंवा प्रवृत्तींना, आळा बसावा साहित्याने

अंतरंगात शिरूनी, ओळख करावी स्वराज्याची
तानाजी वा बाजीची, किर्ती ऐकवावी स्वामीनिष्ठेची

जाणता राजा माझा, विचाराने तळपावा घरोघरी
नीती आणि विश्वबंधुत्वाची, जोपासावी वृत्ती खरी
       -विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता