अफवा


       अफवा..
काय अफवा आज आली
माझ्याच मृत्युची बातमी कानी आली

दुःख ही फार झाले
विघ्नसंतोषाची वाट मोकळी झाली

क्षणभर दिवास्वप्नाची
मनोकल्पित रास ढासळली गेली

वरवर का होईना
प्रेमाची उधळण मात्र स्वस्त झाली

होत्याचे नव्हते म्हणत
सर्व काही सरमिसळ दुरवर पसरली

मित्रांची भाऊगर्दी
खोचक बोलत सरळ दारात शिरली

भ्रम निराशा होवुन
खदखदुन आयुष्याची वर्णीच लांबवली

नाम सार्धम्याची अफवा
आपल्या परक्याची चित्रफित होवुन गेली
          -विशाल दा.धिवरे
अंबासनकर /९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता