तु...


तु...
तुझ्या पापण्यांची उघडझाप,
तरळणारी नजर तशीच कैद आहे

प्रिये, तू माझ्या काळजातील,
अंतरीची न सुटलेली पैंज आहे

ओठावरील तीळाचा गोडवा,
नुसता माझ्या लाळेतच कैद आहे

गालावरील पडलेली खळी,
कुणाची सुटलेली स्मित पैज आहे?

उडणारी गालावरील लट,
माझ्या ईर्षेची खरी पाईक आहे

सगळी आठवण वल्हवणारा
नसता नावाडी मी नाविक आहे

फक्त न्याहळत राहुन
मनगीत गाणारा मी गायिक आहे

    -विशाल दा.धिवरे
अंबासनकर /९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता