वारा


       वारा
आज दिवसभर बिलगला
काहीसा शितल, गोंधळलेला
मध्येच हळवा होत
क्षणभर थबकला
अंगावर शहारे उठत
मी घाबरलो थोडा
साथीची लागण मलाही?
पण परत भयान शांतता
गरगर भरभर सर्रर...
कवेत घेतल्यागत
दिवसभर झोंबला
कवटाळीत राहीला
इकडुन तिकडे
तिकडुन इकडे
भर उन्हात
हवाहवासा
अन् नकोसा सुद्धा
कधीनवत आज
फारचं शेफारला
कानावर शहारला
अन् कुजबुजला
मीच तो वारा.....।
       -विशाल दा.धिवरे
अंबासनकर /९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता