दप्तर



                    दप्तर

सुट्टी असते तेव्हा
माझ्याशी असते कट्टी
शाळा सुरु झाल्यावर 
होते पक्की गट्टी




माझ्याबरोबर असते 
पाटी, वही, पेन 
आणि त्याच्या जोडीला 
बाटली आणि टीफेन 

कधी खाऊ असल्यावर 
जाते कसे फुगून 
पण पुस्तके नसल्यावर 
बसते मात्र रुसून 







कुणी म्हणते पिशवी 
आणि कुणी म्हणते सॅक
ही तर आहे
माझ्या शाळेची बॅग 
                                  
 -------------  -----  विशाल दा. धिवरे
                                  अंबासनकर

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता