मी जर वरूण झालो असतो

  मी जर वरूण झालो  असतो


  मी जर वरूण झालो  असतो
आभाळावर कडाललो असतो
शेतकरयांच्या दुखापायी
धो धो करीत रडलो असतो

 शेतकरयांच्या आनंदासरशि
वाऱ्याबरोबर  झुललो असतो
पडून सरी वर सरी
मातीत मी सुखावलो असतो

फ़ुलणाऱ्या पिकांवरती
दवबिंदु मी झालो असतो
सोनेरी त्या किरणांबरोबर
परत आभाळात गेलो असतो                           - विशाल धिवरे














Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता