शिक शिक रे बाळा....(डिजिटल शाळेबाबत)



शिक शिक रे बाळा....(डिजिटल शाळेबाबत)

शिक शिक रे बाळा
आता तरी शाळा
काळ आता बदलेल
नसेल री फळा...!!ध्रु!!

संगणकाच्या पडद्यावर
अंक मुळाक्षरे येतील
गाणे गात नाचत
तुझ्याशी ते बोलतील
तेव्हा लागु दे लळा.....!!!!

पेन नाही ,पेन्सिल नाही
हातात पाटी ट्याबलेट राहील
फिरवत गिरवत अक्षर होतील 
 टाळ्या वाजत हर्ष होईल
तेव्हा लागू दे लळा !!!!

कवितांचे तर सांगणे नको
सुरात सुर मिसळले जातील
गोष्टीही आता
पडद्यावर दिसतील
तेव्हा लागू दे लळा !!!!

भौमितीक आकार
बोलत बोलत जवळ होतील
गणितांची आकडेमोड
एका क्लिकवर भर भर होईल
तेव्हा लागू दे लळा !!!!                       विशाल धिवरे


Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता