कोण सावरेल मज निर्माता

 कोण सावरेल मज निर्माता 

हरित तृण ही भ्याली आता
मेघराजा  मेघराजा . . .
म्हणत कृषकही निजली आता
सांग रे भ्राता . . .
कोण सावरेल मज निर्माता !!धृ!!

आस ही फुलराणीची
पिक अन थोड्या पाणीची
अरे ये कल्पतरू दाता
पांग फिटतील जाता जाता
सांग रे भ्राता . . .
कोण सावरेल मज निर्माता !!१!!
कडी कपारी पोरकट दिसती
अंगावरती मळकट नेसती
अरे तुच पिता
अन धरित्री ही माता
सांग रे भ्राता . . .
कोण सावरेल मज निर्माता !!२!!                            - विशाल धिवरे

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता