कोण सावरेल मज निर्माता
कोण सावरेल मज निर्माता हरित तृण ही भ्याली आता मेघराजा मेघराजा . . . म्हणत कृषकही निजली आता सांग रे भ्राता . . . कोण सावरेल मज निर्माता !!धृ!! आस ही फुलराणीची पिक अन थोड्या पाणीची अरे ये कल्पतरू दाता पांग फिटतील जाता जाता सांग रे भ्राता . . . कोण सावरेल मज निर्माता !!१!! कडी कपारी पोरकट दिसती अंगावरती मळकट नेसती अरे तुच पिता अन धरित्री ही माता सांग रे भ्राता . . . कोण सावरेल मज निर्माता !!२!! - विशाल धिवरे