Posts

Showing posts from July, 2018
      तरुणाई.. रास रोस नवखे चेहरे हतबल होतात भविष्याला विसरून जीवनाची नांदी कोसत बसता नशिबाला अर्धवट स्वप्नांकरवी फडकविता पंख कशाला? दुर्बल करित मनाला सदा कोसता आई बापाला कतृत्वाची वेळ भिरकावु न चिकटून बसता कट्टयाला एकदाच हो पुरून टाका वाममार्गाच्या मी पणाला लक्ष्य ठरवुन कार्य करा रे उगाच गमवता क्षण कशाला सखे सोबती नाती गोती सदा हसती क्षणाक्षणाला आपली आपण निती ठरवा जगुनि नवख्या तरुणाईला न पडता डगमगता उठा रे बनवित आदर्श जीवनाला            -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७

मेळा विठुरायाचा...

मेळा विठुरायाचा... गजर विठुरायाचा दुमदुमे पंढरीत आषाढी एकादशीला हरिनाम भजनात लाडका कानडा वठे कर्नाटकी रूबाबात अवघा मेळा तयाचा एक होई आषाढात गात थोरवी तयाची वारकरी उल्हासात भेटुनि तया पंढरी रोमांच उठे अंगात आस भेटी दर्शनाची पुर्णत्व पदस्पर्शात सावळा विठु तयांचा उठुनी दिसे मेळ्यात           -विशाल दा. धिवरे अंबासनकर/ ९९२१९३४६३७