Posts

Showing posts from May, 2018

वेध पाऊसधारेचा

वेध पाऊसधारेचा ढगांचा ढीगच ढीग दररोज सतावतोय भल्या पहाटे गर्दी करत थुई थुई थबकतोय काळाकुट्ट होवुन गडा गडा किंचाळतोय नभाशी संगनमतीने शेतकऱ्यांना खुणावतोय गर गर टपटप करून गप्प घुमानं पडतोय सुर्यराजाच्या आगमनाने दुरवर पळत सुटतोय कापसासारखा पिंजुन मेंढ्याच मेंढ्या भासवतोय रवी गुराखी नभाचा  आभाळच जणु हाकतोय वेध पाऊसधारेचा मेघ रंगात उजळतोय येईल मान्सुन वारा सुर्र सुर्र करत ओरडतोय           -विशाल दा. धिवरे          अंबासनकर/ ९९२१९३४६३७
...वाटलो गेलो अंतर मनी काळजात माझ्या या सुख आणि दुःखात वाटलो गेलो पसरले रंग निसर्गी तऱ्हेतऱ्हेचे आकाशी इंद्रधनुत थाटलो गेलो अंथरूनि कवडसे भूवरी जरी ग्रहगतीने दिन राती वाटलो गेलो बहरूनि विविध फुले बागेत तरी गुलाबी सुगंधात मोहलो गेलो माणुस म्हणुन जन्मी विश्वात या धर्म जाती रंगात रंगलो गेलो       विशाल दा. धिवरे      अंंबासनकर/ ९९२१९३४६३७