शिक शिक रे बाळा....(डिजिटल शाळेबाबत)
शिक शिक रे बाळा ....( डिजिटल शाळेबाबत ) शिक शिक रे बाळा आता तरी शाळा काळ आता बदलेल नसेल ज री फळा ...!! ध्रु !! संगणकाच्या पडद्यावर अंक मुळाक्षरे येतील गाणे गात नाचत तुझ्याशी ते बोलतील तेव्हा लागु दे लळा .....!! १ !! पेन नाही , पेन्सिल नाही हातात पाटी ट्याब लेट राहील फिरवत गिरवत अक्षर होतील टाळ्या वाजत हर्ष होईल तेव्हा लागू दे लळा !! २ !! कवितांचे तर सांगणे नको सुरात सुर मिसळले जातील गोष्टीही आता पडद्यावर दिसतील तेव्हा लागू दे लळा !! ३ !! भौमितीक आकार बोलत बोलत जवळ होतील गणितांची आकडेमोड एका क्लिकवर भर भर होईल तेव्हा लागू दे लळा !! ४ !! विशाल धिवरे