Posts

Showing posts from October, 2017

बँनर

                  बँनर प्रेम असो वा दु:ख बँनरच व्यक्त होतात. जीवा भावांच्या माणसांचे दुःख जाहिरातबाजीत दाखवतात . कधी ४*५ ची बातमी तर कधी पुर्ण पानच दुखवटा बनते. हे ज्याचेे त्याचे आर्थिक बजेटच ठरवते. नुसता देखावा असतो की ते प्रेम, हे निर्मिकालाच ठाऊक.  जिवंत असे पर्यंत असतात नुसते भावुक. मरणानंतर अश्रु ही उसणेच असावेत. जीवन मरणाच्या खेळातील दवबिंदु दिसावेत. आता कागदाचा आकार सर्व ठरवतोय. फोटोच्या मर्यादेत सर्व काही बोलतोय.                                           .---   विशाल धिवरे