Posts

Showing posts from February, 2016

प्रेमाचा शेवट झाला ......... ( मंगेश पाडगांवकर निधन )

प्रेमाचा शेवट झाला ......... ( मंगेश पाडगांवकर निधन दिवशी  ) मराठी कवितेतील प्रेमाचा शेवट झाला पाडगावकरांच्या निधनाने प्रेमी शब्दांचा अंत झाला .....!!धृ !! चिरतरुण देहाचा कोमल मनाचा अस्तिम प्रेमाचा सूर्याचा अस्त झाला ........!!१ !! सहज फुलणार्या सुगंध देणाऱ्या हळुवार झोंबणारया फुलाचा लय झाला .......!!२!! शब्द तिखट बोबडी मन लाजवी थोपटी स्पर्शकरी हृदयाशी करुण अंत झाला .....!!३!! एकविसाव्या शतकातील प्रेमाचा प्रोटोकॉल हरवला नियतीच्या व्हायरासातून प्रेमरवी डिलीट झाला.....!!४!! सांगा जगायचं कसं सांगणाऱ्या रात्रीचा मधुचंद्र झोपी गेला प्रेमाचा शेवट झाला ...!!५ !! ......................विशाल दा. धिवरे